रविवार, ३१ जुलै, २०१६

टिटवी

मी काही विचारवंत नाही ना पक्षी निरीक्षक...

पुण्यात (नावाला) राहत असुन सुद्धा सिमेंट जंगलाच्या आजूबाजूला थोडेसे जंगल पहायला मिळते हे आमचे नशीब.
काही दाट झाडं आहेत यामध्येच कधी ससे तर कधी मुंगुस पहायला मिळते. तसेच बरेचसे पक्षी पण आहेत.

त्यातलाच एक पक्षी आहे "टिटवी", भु-या रंगाच्या ह्या पक्ष्यावर माझ्यामते निसर्गाने खुप मोठा अन्याय केला आहे. निसर्गाने त्याला अश्या चक्रांमध्ये अडवले की तो बिचारा तरी काय करेल.

हा पक्षी जमिनीवर घरटं करुन त्यामधे आपली अंडी देतो. इतर पक्षी मात्र झाडाच्या फांदीवर अथवा सहज न पोहचता येईल अश्या ठिकाणी अंडी देतात. जमिनीवर अंडी घातल्याने साप, कुत्रा, मांजर, मुंगुस आणि बरेचशा शिका-यांना सहज शिकार मिळते. बिचा-या टिटवीचे भविष्य अंधारात असते.

मात्र ह्या पक्ष्याला निसर्गाने जोरदार आवाज दिला आहे ज्याच्या साह्याने तो शिका-याला घाबरतो आणि आजूबाजूच्या परिसरातील इतर प्राण्यांना सुचीत देखील करतो. मात्र असे असुन सुद्धा मनुष्य नावाच्या प्राण्याने त्याला अपशकुनी बनवून टाकले.

आपल्यावर आलेलं संकट दुसऱ्याला समजावे म्हणुन ओरडणाऱ्या ह्या पक्ष्यामुळे ते संकट आता आपल्यावरही येणार असा गैरसमज/अंधश्रद्धा करुन घेतो.

ह्यामुळेच मला या पक्ष्याबद्दल सहानुभूती वाटते, आणि त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होते.

मी एक हौशी लेखक
Related Posts Plugin for WordPress, Blogger...