सोमवार, २५ जुलै, २०११

फुसका हरभजन

५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी...

लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.

मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.


१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अ‍ॅक्शन मुळे तो संघा बाहेर गेला. ब-याच अडचणीतून बाहेर येते जखमी अनिल कुंबळेच्या जागी ऑस्ट्रेलिया विरुध्द संघात आला. २००० साली झालेल्या या मालिकेत तो हिरो ठरला त्याने एकूण ३२ बळी घेतले आणि स्टीव्ह वॉच्या बलाढ्य संघाला पराभुत करण्यात भारताला यश आलं.

त्या मालिकेत केलेली त्याने गोलंदाजी आणि लॉर्ड्स कसोटी मध्ये केलेली गोलंदाजी या मध्ये मला काहीच बदल जाणवला नाही. हरभजन एक अत्यंत मर्यादित गोलंदाज आहे, त्याची गोलंदाजी मध्ये काहीच विविधता मला दिसत नाही. एकच प्रकारचा टप्पा, गती आणि वळण. ही कसोटी जेव्हा सुरु झाली तेव्हा संघात सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे, सगळ्यात जास्त बळी घेतलेल्या, त्यात इंग्लंडचे फलंदाज फिरकी समोर कमकुवत. अशा जमेच्या बाजु असतांनाही त्याचे प्रदर्शन हे असे.

हरभजन फक्त आणि फक्त ऑफ स्पिन टाकतो, ज्या वेळी त्याला जास्त बाऊन्स मिळतो त्यावेळी त्याला विकेट मिळते.

हरभजन त्याच्या जास्तीत जास्त कसोटी अनिल कुंबळे सोबत खेळला, तो नेहमीच म्हणतो की मला त्याचा फायदा झाला मात्र तो दिसून येत नाही. कारण अनिल कुंबळे ची एक विशेषता होती ती म्हणजे तो त्याच्या चुकांतून तो शिकायचा आणि पुन्हा ती चुक होणार नाही याची काळजी घ्यायचा मात्र असे हरभजन करतांना दिसत नाही. पहिल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत केलेली कामगिरीच्या जवळपास ही कामगिरी त्याला परत नाही करता आली.

१९९८ च्या जवळपास ऑफस्पिनर "दुसरा" टाकण्याचा शोध सकलेन मुश्ताक ने लावला, त्याच बरोबर त्याने तो उत्कृष्ट कसा टाकायचा हेही जगाला दाखवले. हरभजन, मुरलीधरन ने ही कला शिकली. पण सकलेन, मुरलीधरन जेव्हा दुसरा टाकायचे तेव्हा फलंदाजाला ते ड्राईव्ह करायला भाग पाडायचे. त्या मुळे ऑफस्पिनर समजुन फलंदाज चुकायचे आणि बाद व्हायचे. पण जेव्हा हरभजन सिंग दुसरा टाकतो तो खुपच आखूड टप्प्याने टाकतो त्या मुळे फलंदाजाला बराच वेळ मिळतो आणि मागे जाऊन तो आराम कट किंवा पुलचा फटका मारू शकतो. काळ बदलला आणि मेंडीस, आर. अश्विन सारखे स्पिनर आले आणि कॅरम बॉल चा उगम झाला, हरभजन ला हे सुद्धा जमत नाही.

हरभजनची एक मर्यादा जी सर्व देशाच्या फलंदाजांना माहिती आहे ती म्हणजे  पहिल्या काही षटकात हरभजनला विकेट मिळाली तर तो चांगली गोलंदाजी करतो पण तसे नाही झाले तर तो फलंदाजाला हवी तशी गोलंदाजी करतो. त्याचा मारा स्वेर्य होतो आणि रन काढणे अत्यंत सोपे होते. दुसरे एक म्हणजे त्याच्यावर हल्ला केला की ही हरभजन दिशाहीन गोलंदाजी करतो.

२००९ च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये भारत अपयशी ठरला होता, इग्लंड विरुद्ध सामना भारताने ३ धावाने गमावला आणि खापर फलंदाजी वर फूटले. पण कमी पडलेल्या धावा सर्वांना दिसत होत्या मात्र हरभजन ने दिलेल्या १० वाईड कोण्याच्याच लक्षात नाही. हरभजनचा फास्ट बॉल हा लेग स्पंम्प च्या बाहेर जातो. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर हे त्याला कळाले पाहिजे आणि हा बॉल टाकणे टाळल पाहिजे, मात्र आज ही तो ही चुक करतो.

माझ्या मते आता वेळ आली आहे, हरभजन ला जुन्या कामगिरी पेक्षा सद्य कामगिरीच्या जोरावर संघात ठेवावे. नवीन स्पिनरला संधी द्यावी. 

६ टिप्पण्या:

 1. पूर्णतः सहमत मित्रा !!

  >> मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.

  अगदी अगदी !!!

  उत्तर द्याहटवा
 2. हरभजन सिंग हा सध्याच्या टीममधला इरफान पठाण आहे. जो बॅटिंग करायला शिकला पण बॉलिंग करणे विसरला. छान झालाय ब्लॉग. अमित मिश्रा आर. अश्विन या सारख्या बॉलर्सची करियर त्याच्यामुळे सडतंय. त्याला आता खरंच वगळण्याची गरज आहे.

  उत्तर द्याहटवा
 3. This is just start...give him some time to adjust to the conditions...

  "Turbanator" will come back with a bang!

  उत्तर द्याहटवा
 4. कधीतरी चांगले खेळणे हा आपल्या सर्व खेळाडूंचा स्ट्रांगपॉइंट आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. अगदीच काही वाईट गोलंदाज नाही तो...कधीतरी चांगली गोलंदाजी ही करतो तो...(कधीतरी!)
  टेस्ट मध्ये ४०० विकेट मिळवणे म्हणजे तितके अवघड नाही कारण बोलिंग करणाऱ्या कुणाला तरी विकेट मिळणारच...वन डे मध्ये हरभजनची खरी पोल खुलते

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...