मंगळवार, १७ मे, २०११

मौजमजा X आंदोलन

हा संपुर्ण आठवडा पेटला आहे. घराबाहेर न पडण्याचे आता दोन सबळ कारणं मिळाली आहेत. एक तर उन्हाळा आणि दुसरं म्हणजे पेट्रोल दरवाढ.

या आठवड्यात झालेल्या ५ रुपयांच्या दरवाढीचे पडसाद संपुर्ण देशात पहायला मिळाले. कुठे मोर्चा, कुठे निदर्शने, तर कुठे निषेध व्यक्त करण्याचे नवनवीन प्रकार, संतापलले विरोधक, न्युज चॅनल वरचे चर्चासत्र.

आता सवाल असा आहे की खरंच ह्याची काही गरज आहे का? मी या दरवाढीचे समर्थन करत नाही मात्र हे सगळं करून काही फरक पडणार आहे का?

कारण मला सर्वत्र दोन विभिन्न चित्र पहायला मिळत आहे.

दैनिक सकाळ मध्ये आज एक बातमी वाचली. "संभाजी महाराज जयंतीनिमित्त चित्तेपिंपळगाव ते टि.व्ही. सेंटरपर्यंत दुचाकी फेरी" ही बातमी आणि या फेरी मध्ये भाग घेतलेल्या सुमारे ५० युवा कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत.

खूप प्रश्न उभे राहिले, काय साधलं या दुचाकी फेरीतून??? किती पेट्रोल वाया गेले असेल?
या युवा कार्यकर्त्यांनी हीच फेरी चालत किंवा सायकलवर काढली असती तर प्रतिसाद ही जास्त मिळाला असता आणि प्रसिद्धीही. अशा फे-या काढून एकीकडे पेट्रोल जाळायचे आणि दुसरीकडे सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या.

औरंगाबादच्या महापौर ने तर कहरच केला ह्या चक्क राजेशाही बग्गीतून कार्यालयात आल्या. अशी बग्गी राजे महाराजे वापरताना किंवा चित्रपटाच पाहायला मिळते. आता हा निषेध म्हणायचा की जनतेची चेष्टा. खरं सांगा तुमच्या आमच्या सारख्याला परवडणार आहे का अशी बग्गी.

दरवेळी पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर न्यूज चॅनलवाले चर्चासत्र भरवतात. ह्या संवादाचा विसंवाद होतो, कुणी सरकारची बाजु घेतं तर कुणी जनतेची आणि जनता शांतपणे हा सुपर हीट तमाशा पाहत असते.

निषेध, निदर्शने आणि चर्चासत्र सगळे काही दिवसात बंद होतात आणि जनता पुन्हा पंपावरच्या रांगेत उभी दिसते.
http://indiacurrentaffairs.org


जनता फक्त एवढेच करू शकते का?

नाही... आपण बरंच काही करू शकतो.

 • शक्य तितका जास्त सार्वजनिक परिवहनाचा वापर करा.
 • कार्यालयाच्या जवळपास राहत असाल तर सरळ सायकल वापरायला सुरुवात करा.
 • शक्य तितका कमी दुचाकीचा वापर करा.
 • चालत जाणे शक्य असेल तर चालत जा.
 • अधीक मायलेज देण्या-या वाहनांची निवड करावी.
 • इंधनाची बचत करण्याची सवय लावा.
 • दरवाढी साठी सरकारला वेढीस धरण्यापेक्षा सार्वजनीक परिवहनाचा दर्जा सुधारण्याचा हट्ट धरा.
 • कंपन्यांनी कर्मचा-यांना सायकलवर येण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यामुळे प्रदुषण कमी होईल, पार्किंगची समस्या येणार नाही.
 • सरकारने सायकल वापरणाऱ्या व्यक्तीला कर सवलत द्यावी.

मला माहिती आहे ह्या हायटेक जगतात या गोष्टी पटायला जरा अवघड आहेत, पण ह्या गोष्टी साध्य करणं आज आपल्या हातात आहे. भविष्यात जेव्हा काहीच पर्याय उरणार नाही तेव्हा ह्याच गोष्टी नाईलाजाने कराव्याच लागतील.

बंद करा आंदोलने, कमी करा मौजमजा. परिस्थितीचा विचार करा वेळ अजुन ही आपल्या हातातून गेलेली नाही.

३ टिप्पण्या:

 1. Nahi mitra, patnarya goshti lihilya aahet aani tya ashakya vagaire kahi nahit. Punyat je life-cycle mall aahe tyacha owner, ulhas joshi ha swataha ek cyclist aahe, aani to tyachya comp madhil employee na cycle ver yenar asal ter mahina bhatta sudha deto.

  Jar to karu shakto ter moth mothya IT companya ka nahi?

  Ichha asel ter sarv shaka ahe bagh :)

  Aniket

  उत्तर द्याहटवा
 2. मला तर चालायला फार आवडते आणि सवयही आहे त्यामुळे मला फार त्रास होईल असे काही नाही.
  मला स्वत:ला कधी गाड्यांमधून फिरायला आवडत नाही. आणि सगळ्यांनी स्वत:च्या नव्या गाड्या घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला तर वाहतुकीचे प्रश्न अधिक सुटतील हे कोणालाच लक्षात येत नाही.

  उत्तर द्याहटवा
 3. खर आहे मित्रा फारच सुन्दर लिहिले आहे अणि त्याबद्दल तुझे आभार, खर्च आज गरज आहे याची. अणि सायकल चलाव्ल्याने व्यायाम तर होतोच व स्तामिना पण सुधारतो.

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...