सोमवार, १४ मार्च, २०११

व्यक्ती आठवणीतल्या: अनमोल केळकर उर्फ केळ्या (भाग-3)

केळ्या ब-यापैकी विसराळू होता. आईने दिलेली ताकीद तो विसरायचा मात्र एक गोष्ट अशी होती तो नियमित करायचा ती म्हणजे झोपण्या अगोदर बॅग मधुन "धौती-योग" ची बाटली काढून एक चमचा चुर्ण खायचा. आम्ही सगळे ते पाहायचो पण त्याचा परिणाम दुस-या दिवशी सकाळी पहायला मिळायचा. कारण केळ्यानी जर एक चमचा चुर्ण खाल्ले नाही तर दुस-या दिवशी त्याचा डाटा डाऊनलोड व्हायचा नाही. बरं ह्या डाऊनलोडची स्पीड ही डायल-अप सारखी होती अगदी ३२ केबीपीस....

आम्ही खुप खुप वैतागायचो, दाराबाहेर उभं राहुन मिलिंद शांतपणे गाणं म्हणायचा, "बडी देर हुई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला..." पण केळ्यासाठी आम्ही सगळं सहन करायला लागलो.

आम्ही केळ्याला त्याच्या सगळ्या सवयी सोबत स्विकारलं कारण त्याचं Knowledge sharing करण्याच्या गुणामुळे. तो भेटण्यापुर्वी मी ब-याच लोकांना भेटलो होतो पण, ज्ञान वाटल्याने वाढते असा विचार करणारे कोणीच भेटलं नव्हतं. समोर बसलेल्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगितली तर तो आपलं ज्ञान चोरेल असा विचार करण्या-यापैकी केळ्या नव्हता. इंग्रजी, विज्ञान असो गणित तो शिकविण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी कायम तयार असायचा. नोकरी साठी लिहिल्या जाणारे कव्हर लेटर त्यानेच मला लिहून दिले. इंटरवुव्ह मध्ये कसे बोलायचे याची त्याने माझ्याकडून भरपूर प्रक्टीस करून घेतली होती.

पण अधून मधुन केळ्याचा दंगा चालूच असायचा. एखाद्याचा पगार असो की वाढदिवस किंवा काहीही कारण असलं की केळ्या उत्तम मधुन जिलेबी घेऊन आलाच समजायचं.

केळ्याची आणि लादेनची खुन्नस होती, कदाचित आजही असेल... या खुन्नसचे कारण म्हणजे ९/११ ला अमेरिकेवर झालेला आतंकवादी हल्ला. केळ्या खुप हुशार होता आणि त्याला अमेरिकेतल्या एका कंपनीत नोकरी मिळाली होती. पण १३ सप्टेंबर ला त्याला फोन आला आणि सगळ्या अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविण्यात आले. केळ्या खुपच निराश झाला होता. कारण ते विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर नव्हे तर केळ्याच्या स्वप्नांवर आदळलं होतं.

केळ्या आणि मी खुप छान मित्र झालो होतो. पण त्याच्या मैत्रीचा सहवास थोड्याच काळापुरता मिळाला कारण मला नोकरी मिळालं नशिबाने ठिकाण होतं नाशिक. केळ्या खुप खुश होता कारण मी त्याच्या गावी जाणार होतो, मात्र मी एका चांगल्या मित्रापासून दुर जात होतो. थोड्याच दिवसात केळ्या नरेंद्र मोदींच्या राज्यात गेल्याचं समजलं तसा त्याने मला ईमेल केला होता.

आज दहा वर्ष होत आहे या गोष्टीला... केळ्यासारखा एक मित्र भेटला पण त्याचा सहवास जास्त लाभला नाही. करिअर, नोकरी, पैसा या गोष्टींच्या मागे लागल्याने आम्ही एका चांगल्या मित्रापासुन दुर दुर जात राहिलो. परवा जेव्हा एकाने Knowledge sharing करण्यात टाळाटाळ केली, तेव्हा मला चटकन केळ्याची आठवण झाली. वाटलं त्याला सांगाव हे सगळं की केळ्या कसा होता.

काळाच्या ओघात आज मी खुप दुर आलो आहे मात्र केळ्या कुठे आहे हे काहीच माहिती नाही. जर तुम्हाला केळ्या कुठे भेटला तर त्याला सांगा की त्याचा एक जुना मित्र त्याची "उत्तम" च्या बाहेर त्याची वाट बघतो आहे...

(समाप्त.)

५ टिप्पण्या:

 1. सहीच लिहिले आहे बॉस, एका झटक्यात बॅचलर पोरे, फ़्लॅट्स, राडे, पसारा अन मुख्य म्हणजे यारी आठवली
  फ़ारच मस्त अन ओघवते लिहिता तुम्ही...

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद गुरु...

  माझ्या ब्लॉग तुमचं स्वागतं आहे.

  उत्तर द्याहटवा
 3. मित्रा , मला तुझ्या ब्लॉगबद्दल प्रणव कडून ऐकले आणि आज त्याने मला लिंक पाठवली...
  मी सगळे लेख वाचले...
  भारी लिहितोस...लिहिण्याची पद्धत आपलीशी वाटते...

  उत्तर द्याहटवा
 4. मित्रा , मला तुझ्या ब्लॉगबद्दल प्रणव कडून ऐकले आणि आज त्याने मला लिंक पाठवली...
  मी सगळे लेख वाचले...
  भारी लिहितोस...लिहिण्याची पद्धत आपलीशी वाटते...

  उत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद अनिकेत,

  तुझ्या सारखे वाचक मिळाले की लिहायला हुरूप येतो.

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...