शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

कांगारूंचे पानिपत

थ्री चिअर्स फॉर इंग्लंड हीप हीप हुर्रे, हीप हीप हुर्रे...

इग्लंड-३ वि. ऑस्ट्रेलिया-१ हे पटत नसलं तरी खरं आहे. नोव्हेंबर २०१० मधे जेव्हा इंग्लंड आपला संघ घेऊन ऑस्ट्रेलिया मध्ये आला तेव्हा ब-याच जणांना इंग्लंडच्या विजयाची खात्री नव्हती. पण जबरदस्त खेळ, आत्मविश्वास आणि सुरेख सांघिक कामगिरी वर २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया मध्ये मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलिया च्या पराभवाची बरीच कारणं आहेत.

त्यापैकी एक म्हणजे "अतिआत्मविश्वास", जेव्हा केव्हा एखादा संघ ऑस्ट्रेलिया मध्ये येतो तेव्हा मिडिया, पुर्व खेळाडू आणि वर्तमान कोच व कर्णधार त्या संघाशी शाब्दिक युद्ध सुरु करतात. या अ‍ॅशेस च्या वेळीही असेच काहीस घडले.

दुसरे प्रमुख कारण ठरले गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीमध्ये २० विकेट घेण्याची धमकच नव्हती, त्याहून महत्त्वाचे ठरले दर्जेदार फिरकीपटू ची कमतरता. शेन वॉर्न च्या निवृत्ती नंतर एकही चांगला फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला मिळाला नाही. येथील प्रथम श्रेणी लीग जगातील सर्वात चांगली समजली जाते पण एक ही उत्तम फिरकीपटू नाही. स्मिथ, बीअर हे काही भेदक फिरकीपटू नाहीत.

यापेक्षा ही मोठे कारण होते रिकी पॉटींग आणि त्याचे नेतृत्व...
चुकीची संघ निवड, अतिआत्मविश्वास आणि संघाला एकत्र ठेवण्यात आलेलं अपयश हे पराभवाचे कारण आहे.
Image: http://bbc.in/eoVhoP
या पाच ही कसोटी मध्ये (पर्थ शिवाय) इग्लंड ने वर्चस्व गाजवले. कुक, पीटरसन, अ‍ॅंडरसन आणि स्वान यांनी तर कमालीचा खेळ केला त्यांना उत्तम साथ दिली ती बेल, प्रायर आणि ट्रॉट ने.

पण जबरदस्त कामगिरी केली ती कर्णधार स्ट्राउस ने. त्याने एका कर्णधाराची भुमिके बरोबर एका कसलेल्या फलंदाजाची भूमिका बजावली. संघाला एकत्र ठेवले आणि पर्थच्या पराभवानंतर खचून न जाता मालिकेत विजय मिळवला.

चला तर मग इंग्लंडला विजयाच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या आनंदात शामिल होऊ.

५ टिप्पण्या:

 1. एक नंबर.....
  नेहमीप्रमाणेच संपूर्ण मॅचचे विष्लेशन अतिशय चांग्ले लिहीले आहे.असेच लिहीत रहा...

  उत्तर द्याहटवा
 2. T-20 World Cup, The Ashes and now wht next…world cup 2011?

  उत्तर द्याहटवा
 3. हम्म्म, निलेश...

  मित्रा तुझी सोबत मिळाली तर क्रिकेटवर एखादं पुस्तक छापू रे...

  आपल्याला काय फक्त विषयच पाहिजे :)

  उत्तर द्याहटवा
 4. ऑस्ट्रेलिया हरली हि तर अतिआनंदाची बाब आहे. ४ वर्षापूर्वी झालेल्या अशेस मध्येहि इंग्लंड ने असाच धुव्वा उडवला होता. तेव्हा फ्रेडीहि चांगल्या फॉर्ममध्ये होता. आणि तेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम हि चांगलीच होती.

  उत्तर द्याहटवा
 5. पानीपत झालं हा वाक्प्रचार वापरणं आपण बंद केलं पाहिजे! त्याचे कारण आपण जाणताच...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...