मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

माझी उडी

गेल्याच आठवड्यात आधी अपर्णा मग हेरंब चा आणि नंतर सुहास चा इमोसनल अत्याचार  वाचला.खुप खुप मज्जा आली वाचतांना. खरं सांगतो हे वाचून मला कॉलेज मधील दिवस आठवले. मी ही कॉलेज मध्ये असतांना माझ्या दादाला असंच एक हिंदी गाणं मराठीमध्ये म्हणून खुप खुप छळायचो. तो तर मला मारायला धावायचा आणि मला अजून उत्साह यायचा.

धन्यवाद अपर्णा, हेरंब आणि सुहास माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल...


आज मी या अत्याचारामध्ये भर घालायचे ठरवले आहे, आणि मध्येच उडी घेत आहे यासाठी क्षमा असावी. पण मी ही संधी सोडणार नाही, प्रयत्न पहिलाच आहे, त्यामुळे सगळे समजून घेतील ही अपेक्षा करतो.****************************************
माझ्यासारखं तु ही कधी प्रेम करुन बघ ना...
प्रेमाची माझ्याकडे प्रिये विचारणा करून बघ ना
किती मज्जा आहे कशी नशा आहे
प्रेम करुन बघ ना...
प्रेम मनातलं स्वप्न आहे, प्रेम तुझ्याशी करायचं
प्रेमाच्या या रंगाने स्व:तालाच रंगवायचं
आजपर्यंत जे सांगायचं ते तुला सागांयचं
मनात तुझ्या लपव आता मनात तुझ्या राहायचं
मनाने सांगीतले आहे मनाने ऎकले आहे
मनाने सांगीतले आहे मनाने ऎकले आहे
प्रेम करुन बघ ना...
************************************
धन्यवाद. येथेच थांबतो.

५ टिप्पण्या:

 1. बिचारे आम्ही. तू खरंच संधी सोडलेली नाहीस.

  उत्तर द्याहटवा
 2. कांचनताई, धन्यवाद मला झेलल्या बद्दल,
  मी संधी कधीच सोडत नसतो.

  पुन्हा असे धाडस करू का??????? :)

  उत्तर द्याहटवा
 3. छान...आणि ब्लॉग टेंप्लेटही मस्त.

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद सागर,

  मेहनत का फल मिठा होता है ।

  उत्तर द्याहटवा
 5. नागेश.. अरे आम्हाला कसले धन्यवाद.. आम्ही तर त्या साखळीतलेच दुवे होतो :)

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...