शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

तारांबळ

सध्या माझी जाम तारांबळ उडाली आहे, कारण मला मनासारखे ब्लॉग टेम्पलेट मिळत नाहीये. गेले काही दिवस मी आंतरजाल शोध शोध शोधूनही एकही मनासारखे टेम्पलेट मिळाले नाही.

तीन-चार साईट पालथ्या घातल्या पण काही उपयोग झाला नाही, गंमत अशी झाली की, बरेच टेम्पलेट डाऊनलोड केले त्यामध्ये काही त्रुटी होत्या. जसे काही विजेट सपोर्ट नव्हते तर काही मध्ये मजकुर एकावर एक येत होता. एकाततर चक्क प्रतिक्रियाच दिसत नव्हत्या.

त्यानंतर मग काही आवडते ब्लॉग समोर ठेवूनही पाहीले तसे टेम्पलेट शोधले पण काही उपयोग झाला नाही कारण तशी टेम्पलेट आता उपलब्ध नाहीत.

एक वेळ विचार केला की आपला ब्लॉग सरळ वर्ड प्रेस वर शिफ्ट करावा पण ब्लॉगरची साथ सोडावीशी नाही वाटत म्हणून तात्पुरता ब्लॉगरचा एक डिफॉल्ट टेम्पलेटच सेट केला.

पण मी यावरही समाधानी नाही आता मी शोधत आहे एक UI Designer जो मला मदत करेल एक छान टेम्पलेट डिझाईन करण्यात.

बघु भेटत का कोणी मदतीला...

२ टिप्पण्या:

 1. ब्लॉग टेंप्लेट मला ही फार छळते..मनासारखे मिळताच नाही...
  काही छान टेंप्लेट इथे शोधू शकता-
  http://btemplates.com/

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद,

  माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे.

  साईट सुचविल्याबद्दल आभारी, अगोदरच बघीतली आहे.

  बघु होतंय का काही...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...