नमस्कार मंडळी,
मी नागेश देशपांडे, मी "मी एक हौशी लेखक" जालना या छोट्या शहरात शिक्षण पुर्ण झाल्यानंतर माझी भटकंती चालू झाली.
भटकंती...
स्वप्न पुर्ण करण्यासाठी. हे स्वप्न फार मोठं नव्हतं मात्र छोटी छोटी अशी खुप स्वप्न आहेत. चार सामान्य माणसांना पडतात अशीच...
त्यातलच एक स्वप्न म्हणजे लेखक व्हायचं... त्याची पहिली पायरी आहे माझा हा ब्लॉग.
लिहण्याची आवड कधी आणि कशी निर्माण झाली काहीच आठवत नाही. कधी कधी थोडा वेळ मिळतो व त्यातला थोडा वेळ काढून मी लिहितो. मला अलंकारिक लिहिता येत नाही, पण जे जमेल, जे सुचेल ते मी लिहितो. मुख्य करुन ताज्या घडामोडी, क्रिकेट, बालपणीच्या आठवणी, प्रवासातील किस्से आणि आयुष्यातील कडू गोड अनुभव.
"आयुष्य खूप सुंदर आहे, मी अजून सुंदर बनविणार." हा माझ्या लाईफचा फंडा.
मी सॉफ्टवेअर मधील किडे पकडायचे काम करतो. आणखी एक काम करतो ते म्हणजे, डेव्हलपर लोकांना चाव चाव चावणे.
छंद: लिहिणे, भटकणे आणि फोटो काढणे... आणखी एक तो म्हणजे "सायकलने ऑफीसला जाणे."
मला आवडते हसायला आणि हसवायला, फिरणे, सोशल नेटवर्किंग. प्रवास करणे, असे ठिकाण शोधायचे की जिथे कमी लोक जातात, निसर्गाच्या सानिध्यात जायचे, खुप फोटो काढायचे. ब्लॉग लिहणे.
तरी तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
मी एक हौशी लेखक
मराठी ब्लॉगविश्वात स्वागत मित्रा.. लिहीत रहा, लेखनासाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाअनिकेत
http://manatale.wordpress.com
धन्यवाद अनिकेत,
उत्तर द्याहटवातुमच्या शुभेच्छांची खरंच गरज आहे, असं कोणी प्रोत्साहन दिले की लिहायला सुचत.
sahie boss.. keep on writing..
उत्तर द्याहटवा