शनिवार, २४ जुलै, २०१०

निर्व्यसनाचे दुष्परिणाम

थोडेसे विचित्र वाटले ना शिर्षक वाचुन, प्रश्न पडला असेल ना? पडणारच कारण सर्वांना व्यसनाचे दुष्परिणाम माहित आहेतच पण निर्व्यसनाचे दुष्परिणाम

मला जाणवले आहेत ते...

मला स्वत:च्या एका गोष्टीवर खुप अभिमान आहे ती अशी की मला कोणतेही "व्यसन" नाही. २००१ मध्ये मी पदवीधर झालो आणि त्याच वर्षीच नोकरीच्या शोधात घराबाहेर पडलो आणि आज पर्यंत खुप प्रवास केला, खुप शहरं बदलली आणि कंपन्याही. खुप प्रकारचे अनुभव आले, ना ना प्रकारचे लोक भेटले.

नोकरीला लागल्यापासुन काही सवयी लावुन घेतल्या त्या म्हणजे वेळ पाळणे आणि दिलेले काम वेळेत संपवणे. मात्र गेल्या वर्षात असे काही अनुभव आले की मी या निष्कर्षावर पोहोचलो, की निर्व्यसनाचे दुष्परिणाम असतात.

ऑफीसमध्ये वेळेवर येणे, वेळेत काम संपवणे व संपल्यावरच घरी जायचे ही पध्दत आता जुनी झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण या "कॉर्पोरेट" जगतात इतरही ब-याच गोष्टी महत्वाच्या असतात, ऑफीस व तेथील कामाप्रमाणे स्मोकींग झोन, पब्स, डिस्को थेक हेही तितकेच महत्वाचे असतात हे समजायला लागलं.

बरेच जण ९.३० च्या ऑफीसला ११.०० वाजता येतात, आणि सरळ स्मोकींग झोनला जातात नंतरच मग कामाला लागतात. लंच १.०० घेऊन पुन्हा लगेचच ’तिथे’. जेव्हा ६.३० ला ऑफीस संपल्यावर काही मंडळी घरी जायला निघतात तेव्हाही ही मंडळी ’तिथेच’. असे दिवसातुन हे ३ ते ४ वेळा ’तिथे’ नक्की जातात. त्यामुळे दिवसभरात सरासरी १ तास तरी ही मंडळी ’तिथे’ घालवतात. थोडयावेळाने ही मंडळी लगेचच रात्री "बसायची" जागा ठरवितात व साडे आठ-नऊ ला त्याठिकाणी जातात.

बहुतेक ही मंडळी "बॅचलर" आहेत जी एकटीच रुम घेऊन राहतात. ऑफीसमध्ये उशिरा बसुन काम करण्यापेक्षा आपला वेळ वाढवणे हाच हेतु असणारी मंडळी जास्त. कारण रुमवर जाउन करणार तरी काय? इथे मस्त ए.सी. आहे, इंटरनेट, चहा/कॉफी आहे. झोप आली की जाऊ रुमवर...

इथपर्यंत सर्वकाही ठीक आहे, कोणी काय करावे अथवा करु नये हे ठरवणारे आपण कोण? आपलं आयुष्य कसं जगायच हे आपणच ठरवायच असतं आणि त्यांनी ते ठरवलं आहे. पण त्याचा परिणाम दुस-यावर होतो तेव्हा काय?

माझ्यासारखे कामाशी काम असणारे खुप जण आहेत, पण जेव्हा आम्हा सर्वांचे महिन्याभरातले कामाचे तास कमी भरले तेव्हा जाणवायला लागले "निर्व्यसनाचे दुष्परिणाम"

रात्री उशीरा ऑफीसमधुन बाहेर पडुन ही मंडळी एखादा बार किंवा पब गाठतात, भरपुर ड्रिंक्स घेतल्यावर रात्र उलटल्यानंतर घरी पोहचतात, आणि साहजिकच उठायला उशिर झाल्यामुळे कामावरही उशिरा येतात. दिवसभरात सरासरी एक तासतरी "स्मोकींग झोन" मध्ये घालवल्यानंतर कामातही उशिर होतो, म्हणुन मग उशिरापर्यंत ऑफीसमध्ये बसतात, रात्री उशिरापर्यंत बसल्याने दुस-या दिवशी लागणारे लेटमार्क्स नील होतात व टाईमशीट वर तास जास्त. ऑफीस संपल्यानंतर चालणा-या पार्ट्यांमध्ये प्रमोशन्स ही ठरविली जातात आणि इंक्रीमेंटही...

असे हे चक्र चालुच राहते

माणसाला व्यसन का असते हया विषयी खुप विचार केला, तर त्याचे मुख्य कारणं समोर आलं ते म्हणजे दु:ख आणि ताण आणि ह्या गोष्टींचे निरसन माणुस व्यसनाने करायचा प्रयत्न करतो.

कुठेतरी ऎकले आहे की, "ज्या माणसाला सुखं साजरा करण्यासाठी आणि दु:ख विसरण्यासाठी माणसाशिवाय दुस-या कशाचीही सोबत लागत नाही त्याच्यापेक्षा सुखी या जगात कोणीही नाही"

९ टिप्पण्या:

 1. खरं आहे
  आणि या ड्रिंक्स वर मॅच्यूरिटी ठरते, कामातलं झोकून देणं, व्यापार कौशल्यातली आक्रमकता ठरते तेव्हा संताप अनावर होतो
  मी व्यसनांच्या विरोधात वगैरे नाहीए, कामाची पारख कामावरूनच व्हावी, ऑफिसमध्ये फेसबुक लावून उशिरापर्यंत कोणी बसत असतील तर आमच्याकडून त्या अपेक्षा ठेवू नका

  उत्तर द्याहटवा
 2. >> "ज्या माणसाला सुखं साजरा करण्यासाठी आणि दु:ख विसरण्यासाठी माणसाशिवाय दुस-या कशाचीही सोबत लागत नाही त्याच्यापेक्षा सुखी या जगात कोणीही नाही"

  सुंदर.. अप्रतिम !!

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद प्रसाद, व्यसनांच्या विरोधात मी ही नाही, आणि तुम्ही जे म्हणता की "कामाची पारख कामावरुनच व्हावी" जे मला १००% पटलं.

  उत्तर द्याहटवा
 4. निर्व्यसनीपणाची नशा इतर नशांपेक्षा भयंकर असते.

  उत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद शरयु,

  माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. Chhan lihilay, khare tech lihile. raag kunaala yaayala nako,pan vastusthiti maatra ashich asate.
  htp://savadhan.wordpress.com
  [shabda satyapan navhe chachapani chi garaj kaay?]
  Ny-USA
  30-7-10

  उत्तर द्याहटवा
 7. Nagesh,tu vyasananchya virodhat nahiss....?
  Mag tula konte vyasan ahe..?

  उत्तर द्याहटवा
 8. Very true. We may be in minority today but I am hopeful to be in majority in a few years to come.

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...