रविवार, १८ जुलै, २०१०

लग्न समारंभ

नोकरीला लागल्यापासून मी फार थोडे लग्न अटेंड केलेत. नोकरीचे ठिकाण सारखे बदलत असल्याने गेल्या काही वर्षात अनेक नातेवाईकांनी पत्रिका पाठवूनही मला हजेरी लावता आली नाही. जी काही थोडीफार अटेंड केलीत तिथे अगदीच "सो कॉल सोफिस्टिकेटेड पणा" दिसून आला. आलेल्या पाहुण्यांना पंगतीत जेवण दिले तर ते बुफे मागतात आणि एखाद्या ठिकाणी बुफे असेल तर पंगतीत काय मजा असते तुम्हाला काय माहित असेही म्हणतात. अहो हे लोकं इतरत्र भेटले किंवा लग्नात साधी ओळख द्यायला देखील टाळतात म्हणुन मी ही अशा समारंभापासुन दुरच राहतो.

आज जेव्हा एका कामानिमीत्त सासवडला जावं लागलं, छोटासा प्रवास होता दरम्यान बस मधुन एका ठिकाणी लग्नाचा मंडप दिसला. व-हाडी मंडळी पाहुन मला मामाच्या गावाकडच्या लग्नाची आठवण झाली.

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये आम्ही भावंड मामाच्या गावाला जायचो. खुप छोटंस आणि साध गाव मात्र तरी नाव "खासगावं". एक छोटं १०००-२००० वस्तीच गावं, मातीची घरं, विहीरीवरच पाणी, शेणान सारवलेली आंगणं. जालन्याहुन साधारण तीन तास लागायचे. पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा गावात फक्त एस.टी. यायची ती ही दिवसातुन एकदा व बाजाराच्या दिवशी दोनदा. गावात वीज ही नव्हती, रस्ते नव्हते आणि शाळा फक्त चौथीपर्यंत. तेव्हा मी साधारण ५-६ वर्षाचा असेल. नंतर मात्र गावं बदलल, वीज आली, शाळा आली, नळ आले आणि एस. टी. च्या फे-याही वाढल्या.

दरवर्षी उन्हाळ्यात मामाकडे गेलं की खुप मजा यायची कारण आम्ही १०-१५ भावंड असायचो. शेतात जाणे, गडी लोकांवर नजर ठेवणे, बैलांना चारा-पाणी देणे आणि संध्याकाळी टोपलंभर शेणं घेऊन घरी येणे हीच आमची दिनचर्या असायची.

माझ्या आजीला गावात खुप मान होता त्यामुळे गावात कुठेही लग्न असले की, ती व्यक्ती आजीला निमंत्रण द्यायला स्वत: यायची. ह्या लग्नांची मजा काही औरच असायची. अगदी आठवडाभर हा समारंभ चालायचा. गावात पिठाची गिरणी नव्हती तालुक्याला जावं लागायचं ते सर्वांना परवडत नसे म्हणुन लग्नघरातील पुरुष ५ ते १० किलो गहु अथवा ज्वारी गावातील काही घरात एक आठवडा अगोदरच पोहोचवायचे. मग त्या घरातील बायकां ते धान्य दळुन ठेवायच्या. लग्नघरातील पुरुष ते पीठ गोळा करुन घरी घेऊन यायचे.

गावातील जवळपास सगळेच लोकं यात शामील व्हायचे, जसे मंडप टाकणे, पत्रिका (छापल्या असतील तर) वाटणे, ग्रामपंचायतीच्या फलकावर विवाह सोहळ्याबद्दल लिहीणे आणि गावात दवंडी देणे.

खरी गंमत तर लग्नाच्या दिवशी असायची, सकाळी लग्नघरातील स्त्रीयां व एक पुरुष प्रत्येक घरी जाणार निमंत्रणासोबत थोडं पीठ व गोडतेल देणार. मग त्या घरातील स्त्रीयां यापासुन पोळ्या वा भाक-या बनवुन लग्न घरी घेऊन जाणार. लग्न दुपारी घरासमोर टाकलेल्या मांडवातच लागायचं व तिथेच बाकीचा स्वयंपाक व्हायचां, म्हणजे वरण, बुंदी आणि लुंजी (उकडलेल्या कैरीचे चार काप करुन त्याचे आंबट गोड पातळ लोणचं). त्यावेळच्या त्या पोळ्या किंवा भाक-या खुप मोठ्या असायच्या, म्हणजे आजच्या १= त्यावेळची १/४.

जेवणाची पंगत घरासमोरच्या गल्लीत किंवा रस्तावर चटई टाकुन बसायची, त्यासाठी ती जागा सकाळीच झाडुन व सारवुन घेतलेली असायची. या पंगतीला जायचे म्हणजे ताट, वाटी व पेला आप-आपल्या घरुन घेऊन जावी लागत असे. आम्हाला मात्र पत्रावळ मिळायची.

मग यायची आहेराची वेळ, हा आमच्यासाठी आनंद सोहळा असायचा. कारण आलेल्या प्रत्येक आहेराची रितसर नोंद केली जायची आणि आहेर देणा-याच्या समक्षच त्याची अनाउंसमेंट लाउड स्पीकर वर केली जायची. आहेर काहीही असो म्हणजे अगदी ५ रुपयापासुन ते हंडा, साडी, टॉवेल टोपी या सर्वांची अनाउंसमेंट केली जायची. आम्हाला खुप खुप मज्जा वाटायची.

अंधार पडायला सुरुवात झाली की मग व-हाड मिळेल त्या वाहनाने (टेंपो, बैलगाडी) परत जायचं. अगदी आठवडाभर चालु असलेला हा समारंभ कोणत्याही रुसव्या फुगव्याशिवाय पार पडायचा.

४ टिप्पण्या:

 1. wawa agadi mast lagna lagyache ho... Aajkal tar gharatle natewaik pan kaam karyala natak kartat tar shejaraynche kay bolnar!!!!

  Pan ajunhi kahi gavanmadhe kinva gharanmadhe matra sagle agadi ektra jamun anandat lagnsohala urktat

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद भाग्यश्री,

  माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत.

  खरं आहे आज काल अशी लग्न कमी पाहायला मिळतात. मानापानात अडकलेली माणसं ह्या सोहळ्याचा आनंदच घ्यायचा विसरतात...

  उत्तर द्याहटवा
 3. नागेश, अगदि खर लिहिल आहेस.
  पन हेहि तेवढ्च खर आहे कि परिवर्तन हे ठरलेले आहे, आणी हे परिवर्तन आपन कसे स्विकारतो, हे सुद्धा आपल्यावरच आहे..
  मी असे म्हनत नाही की आधी लग्न वाईट होती किंवा आता ती वाईट होतात...
  पन आपन हे सर्व कसे घेतो आणि करतो यावर हे अवलंबुन असत...

  उत्तर द्याहटवा
 4. नागेशजी जुन्या काळातील लग्नाचे अगदी मोजक्या शब्दात छान वर्णन केले आहेत
  धन्यवाद आणि माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार
  संजय जोशी
  http://sunjayjoshi.blogspot.com

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...