शुक्रवार, २ जुलै, २०१०

मी आणि कॉमन मॅन

मुंबई एक स्वप्नांच शहर, २००६ साली मी या शहरात प्रथम आलो. मुंबई शहराचे विश्चचं खुप वेगळ आहे, तेथील गर्दी, जीवनाचा वेग याचाशी कधीही जुळवता येणार नाही असे वाटत होते. पण "खुपच गर्दी आहे" असे म्हणता म्हणता कधी या गर्दीचा एक भाग होऊन गेलो हे समजलंच नाही.

माझं बालपण जालना सारख्या छोट्या शहरात गेलं. शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबईला जाण्याचा कधी विचारही केला नव्हता. मात्र नशीब आपल्या मनासारखे वागत नाही, २००६ च्या अखेरीस मी या शहरात आलो. नोकरी शोधत असतांनाच या शहराचा एक एक पैलु पहावयास मिळाला. पहिला लोकलचा प्रवास मला आजही आठवतो.

स्लो लोकल ने सुरु झालेला प्रवास सेमीवरुन फास्ट कधी झाला हे समजलेच नाही.

मला सुरुवातीला सेमीफास्ट लोकल असतात हे माहीतच नव्हते, माहीती एवढीच की स्लो लोकल आणि फास्ट लोकल. कल्याणहुन स्लो लोकल समजुन मी एका लोकलमध्ये बसलो. मला घाटकोपरला जायचे होते. हे माहीत होते की फास्ट लोकल घाटकोपरला थांबते पण ठाण्याहुन पुढे जेव्हा लोकल थांबेना तेव्हा मी जरा गडबडलो, लगेचच मित्राला फोन केला. तो म्हणाला, "अरे तु सेमी फास्ट लोकल मध्ये चढलास, घाटकोपरला थांबेल उतर मी तुझी वाट बघतोय..."

मुंबईमध्ये राहुन सर्व अनुभव घेतले जे अस्सल मुंबईकराला नेहमीच येतात, जसे रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाणे, मेगाब्लॉक मध्ये अडकणे, पावसाळ्यात लोकलच्या बंद डब्यात प्रवास करणे. धावती लोकल पकडणे, गर्दीमध्ये, दारात उभेराहुन प्रवास करणे. फास्ट लोकलची माहीती, कोणते स्टेशन कोणत्या दिशेने येते, ईस्ट-वेस्ट इत्यादी इ. बघता बघता मी मुंबईकर होऊन गेलो (पण पु. लं च्या मुंबईकराच्या फक्त १०%)

आज चार वर्ष मुंबईत राहल्या नंतर इतर शहरात मन रमत नाही, मुंबईत राहुन एक शिस्त लागली, कुठेही न लिहीलेले नियम (चांगले) पाळायची सवय लागली. मुंबईत सर्वांनाच घाई असते पण त्याचा त्रास दुस-याला होत नाही पण इतर शहरात फक्त आपल्याच घाई आहे असे विचार करणारेच खुप व त्याचा त्रास आपल्याला हे चित्र पहायला मिळते.
मुंबईत राहुन खुप प्रवास केला, खुप फिरलो मात्र कंटाळा कधीच आला नाही. गेट वे ऑफ ईंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस सर्व पाहिले वरळी सी फेसला आर. के. लक्ष्मणच्या "कॉमन मॅन" सोबत फोटोही काढला.

मी आज मुंबईपासुन दुर जात आहे मात्र हा निरोप परत येण्यासाठी घेत आहे. आता यशाकडे प्रवास सुरु केला असला तरी कालचा हा (मी) कॉमन मॅन अजुनही एक कॉमन मॅनच राहिला आहे.

४ टिप्पण्या:

 1. post tar khup chaan aahe.... phakta pratikriya dyachya astat pan tarihi...
  Lavkar ya parat kadhihi n janyasathi vaat baghtoy.

  उत्तर द्याहटवा
 2. अनिकेत,

  खुप खुप मिस करतो मुबंई चे जीवन आणि तुझ्यासारखे मित्र ही...

  उत्तर द्याहटवा
 3. पुलंच्या भाषेत सांगायचं तर जगात मुंबई आणि पुणे सोडून बघण्यासारखं काय आहे?
  मुंबई जरा जास्तच लाडकी...कारण मुंबईतच जन्मलो आणि मुंबईतच वाढलो...
  मुंबईबद्दल लिहायचे तर मोठा अध्याय लिहावा लागेल...

  उत्तर द्याहटवा
 4. खरं आहे सागर...

  मुंबई सोडल्यानंतर कळालं की मुंबई किती वेगळी आणि अद्वितीय आहे.
  खूप खूप लिहता येईल मुंबई बद्दल...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...