गुरुवार, १ जुलै, २०१०

ऎ चलनेवाले राह में

काही वर्षापुर्वी बजाज कॅलीबर या दुचाकीची एक जाहिरात टि.व्ही.वर प्रसारीत होत असे.
ही जाहिरात आजही मला संपुर्ण आठवते.

ऎ चलनेवाले राह में
रुकना ना हार के
है तेरे इंतजार में
साये बहार के

जब झुम के निकल पडे
मंझील के चाह में
फिर चाहे जितने मोड
मिले आज राह में
हर मोड हर दिशा
है अपनी निगाह में

चलते चलो यह राह
जहॉ तक चली चले
ऎ चलनेवाले राह में
रुकना ना हार के

एक युवक आपल्या हरविलेल्या प्रियसीला शोधण्यासाठी निघतो. खुप प्रयत्न केल्यानंतर ती त्याला सापडते, पण ती भेटल्यावरच त्याला कळते की तिचे लग्न झालेले असुन तिला एक गॊंडस मुलगाही आहे. तरीही तो खचुन न जाता तिला डोळ्यानेच पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि तिथुन निघुन जातो, आणि पुढच्याच वळणावर एक सुंदर तरुणी त्याला भेटते. ही जाहिरात, हिचे चित्रीकरण, हिची संकल्पना व यातील ही कवीता यासर्वच गोष्टीचा मिलाप अतिशय सुंदर आहे.

ह्या जाहिरातीने मला खुप आशावादी बनविले, ही कवीता खुप आशावादी आहे, आयुष्यातील प्रत्येक अवघड वळणावर पुढील वाट फक्त आशावादच दाखवतो. माझ्या आयुष्यात बरीच अवघड वळण आली, त्यांना सामोर जाण्याचे धाडस हे फक्त उद्याच्या आशेवरच मी करु शकलो. कधी कधी तर वाट ही दिसत नसे मात्र या कवीतेप्रमाणे मिळेल ती वाटेवर मी चालत राहीलो. हेच या जाहिरातीमध्ये पहायला मिळते.

या कवितेचा कवी मला माहित नाही, माझ्यासाठी या अनामिक असलेल्या या कवीला या सुंदर रचनेसाठी शतश: प्रणाम...

1 टिप्पणी:

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...