सोमवार, २१ जून, २०१०

गरज आणि व्यसन

मी १३-१४ वर्षाचा होतो त्यावेळेसची घटना आहे. आमच्या घरी संपुर्ण वर्षाचे धान्य खरेदीसाठी मी वडिलांसोबत आडत बाजारात गेलो होतो. दोन तीन तास उन्हात फिरुन आमची खरेदी संपली, त्यानंतर वडीलांनी ती सर्व धान्याची पोती घरपोच देण्यासाठी एक “हमाल” शोधला.
३५ ते ४० वयाचा एक माणुस पुढे आला, त्याला कामाची गरज होती, तो घामाने डबडबला होता. तो अशिक्षीत असावा कारण त्याने पत्ता लिहिण्यास दुस-या व्यक्तीची मदत घेतली. त्याने असतील तसे कपडे घातले होते, पायात साधी स्लीपर आणि जवळ एक कळकट्ट रुमाल होता, जो त्याने डोक्याला बांधला होता. तो हे सर्व सामान (५-६ पोती) ६० रुपयात घरी घेउन येण्यास तयार झाला.
तो माझ्या वडिलांना म्हणाला, “साहेब, २० रुपये आधी द्या, बाकीचे ४० रुपये घरी आल्यावर द्या”
वडिलांनी त्याला २० रुपये दिले व म्हणाले “पिऊन येऊ नकोस”
तो हसत हसत गेला आणि १० मिनिटाने परत आला, मात्र तो खुप दारु प्यालाले होता. वडिलांनी त्याला सामानची आठवण करुन दिली व आम्ही आमच्या स्कुटरवर घरी आलो.
घरी आल्यावर मी वडीलांना विचारले “बाबा, तो हमाल दारु प्याला होता, तरी तुम्ही त्याला सामान आणण्यास का सांगीतले?”
बाबा म्हणाले, “अरे बाळा, त्याचे ते कामच आहे, ही ५०-१०० किलोची पोती उचलणे हे खुप अंगमहेनतीचे काम आहे, अशा कामाचा शरीरावर खुप ताण पडतो. दारु पिल्याने त्याचा हा ताण कमी होतो व रात्री त्याचे अंग ही दुखत नाही”
थोड्याच वेळात तो हमाल हातगाडी ढकलत ढकलत घरी पोहोचला. सर्व पोती त्याने उचलुन आमच्या घरात पहिल्या मजल्यावर आणुन टाकली, व प्यायला तांब्याभर पाणी मागीतले. वडिलांनी त्याला बाकीचे ४० रुपयाऎवजी ५० रुपये दिले. तो खुप खुश झाला व त्याने अत्यंत आनंदात नमस्कार केला व तो निघुन गेला.
साधारण १५ वर्षापुर्वीची घटना असेल ही. आज मी एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. परिस्थीती खुप बदलली मात्र काही अनुभव असे आले की हा “हमाल” मला आठवला.
माझे काही सहकर्मचारी जे स्व:ताला प्रोफेशनल म्हणवतात, उच्चशिक्षीत आहेत, १२-१४ तास एसी मध्ये बसतात, ब्रॅंडेड कपडे शुज घालतात. महागडे मोबाईल वापरतात, यांना गलेलठ्ठ पॅकेजेस आहेत व शारीरिक ताण काहीच नाही तरी दररोज दारु पितात (सॉरी, ड्रिंक्स घेतात).
त्यापैकी एकाला मी विचारले की “तु ड्रिंक्स का घेतो?”
तो म्हणाला, “खुप मानसीक ताण असतो येथे काम करणे म्हणजे”
त्यावर मी म्हणालो, “मग तुझ्या उच्चशिक्षणाचा काय फायदा? तु एवढा ताण ही सहन करु शकत नाही”
तो गप्प झाला.
विचार केल्यावर जाणवलं की तो हमाल किती चांगला होता, जो आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पोते उचलण्याचे काम करत होता. भले तो दारु पिला तरी त्याची ती गरज होती व्यसन नाही.

१३ टिप्पण्या:

 1. खरी गोष्ट. अशिक्षित हमालाला कामाच्या ताणाचा निचरा कसा व्हावा हे कळत नाही म्हणून दारू पितो आणि सुक्षिक्षित पण तेच करतो, तर दोघांमधे फरक काय? एकदम बोधपर वाटला लेख.

  उत्तर द्याहटवा
 2. nice one ! I like it !! Keep writing ! Regards devendra shende

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद
  दीपक, विनय, मैथिली, वैभव, कांचन, देवेंद्र आणि भानस
  आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल.

  उत्तर द्याहटवा
 4. खरच व्यासन , करुण पैसे उधालने सोपे आहेत पण कष्ट करुण पोट भरणे कठीन आहे.पण तीच खरी कसोटी आहे.

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...