बुधवार, ७ एप्रिल, २०१०

कॉफी विथ निलेश...


शिर्षक वाचुन तुम्हाला वाटेल की एखाद्या मुलाखतीबद्दल लिहित आहे मात्र हा किस्सा तर आमच्या फसगतीचा आहे.

पाच वर्षापुर्वीची घटना आहे. मी बर्‍याच दिवसानंतर औरंगाबादला गेलो होतो. जुन्या काही मित्रांना फोन केले मी आलो आहे हे सांगण्यासाठी.

काही वेळातच निलेश कुलकर्णी माझ्या घरी येउन पोहचला. साहेबांकडे नविन बाईक होती, त्यावर शहरभर फिरलो (शहराचं निसर्ग सौंदर्य दिवसंदिवस वाढतेय हे जाणवलं) शेवटी आम्ही गाठलं निराला बाजार...

दुपारची वेळ होती आम्ही दोघे चहा प्रिय मात्र साहेब हिंदीत म्हणाले "आज कॉफी पिते है!" मी ही ठीक आहे म्हणालो. आम्ही एका प्रसिध्द कॉफीच्या दुकानात (मुबंई/पुणे येथे जुने मात्र औरंगाबादला नविन सुरु झालेले) गेलो.
वेटर आला, दोन कॉफीची ऑर्डर दिली. त्यामध्ये त्या वेटरने बदल सुचवले आम्ही ही होकार दिला.

वेटर लगेचच कॉफी घेउन आला, आम्ही कॉफी प्यालो. पाठोपाठ तो बील ही घेउन आला.
आणि धक्काच बसला! रुपये १३८ फक्त...

आम्ही ऎकमेकांकडे पाहिले, काहीही न बोलता बील भरले.
बाहेर पडता पडता निलॆश म्हणाला, "यार एवढ्यामधे तर तिघांचे जेवण झाले असते"

मी चमकुन विचारले, "कोण तिघं?"

तो म्हणाला, "तु, मी आणि तो वेटर..."

६ टिप्पण्या:

 1. राष्ट्र्भाषेत ?? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला? गैरसमज दूर करा.

  उत्तर द्याहटवा
 2. वेटर कशाला? शेजारच्या टेबलवर बसलेली मुलगी दिसली नाही तुम्हाला? काय राव .. कसला चॉइस आहे तुमच्या मित्राचा..
  :) पोस्ट एकदम झकास झालंय बरं कां. एकदम दिलसे :) किप इट अप..

  उत्तर द्याहटवा
 3. श्री. साधक
  धन्यवाद...
  योग्य तो बदल करण्यात आला आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. आम्ही ही असेच हसलो बरं का...

  झम्प्या माझ्या ब्लॉग वर स्वागत

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...