शुक्रवार, २६ मार्च, २०१०

टीम-इंडिया ऑल द बेस्ट


वेस्टइंडीज मध्ये होण्यार्‍या टी-२० विश्चचषकासाठी आज भारतीय संघाची निवड झाली.
२००७ मधील टी-२० विश्चचषक विजेता तसेच सध्याची नंबर १ टेस्ट टीम व नंबर २ एकदिवसीय टीम उत्तम फॉर्मात आहे.

यावर्षीच्या विश्चचषकासाठी निवडलेला संघ पुढील प्रमाणे
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंह, सुरेश रैना, युसुफ पठाण, दिनेश कार्तीक, रविंद्र जडेजा, झहीर खान, प्रवीण कुमार, आशिष नेहरा, हरभजन सिंह, पियुष चावला, विनय कुमार, रोहीत शर्मा.

अतिशय खडतर हंगामातुन उत्तम प्रर्दशन करुन भारतीय संघाने जगाची मने जिंकली. आता पाहायचे आहे की, हा संघ टी-२० विश्चचषकामध्ये कसे प्रर्दशन करतो.

रविंद्र जडेजा सोडुन वरील सर्व खेळाडु आयपीएल २०१० मध्ये खेळत आहेत, ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच म्हणजे ५ दिवसांनी वेस्टइंडीज मध्ये टी-२० विश्चचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे खेळाडुंना आराम नाही मिळणार, सर्व जण थकलेले असतील.

त्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो दुखापतीचा सध्या सुरु असलेल्या आयपीएल २०१० स्पर्धेदरम्यान महेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर व आशिष नेहरा हे जखमी झाले होते हे तिघे किती प्रमाणात तंदुरुस्त आहेत किंवा विश्चचषकासाठी असतील सांगता येत नाही.

गेल्या टी-२० विश्चचषक स्पर्धेत झहीर खान व वीरेंद्र सेहवाग जखमी होते त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला होता. संघ सेमी-फायनल ला पोहचु शकला नव्हता.

या संघ निवडी वर काही प्रश्न उपस्थीत होतात, काही गोष्टी चांगल्या तर काही असमाधानकारक झाल्या आहे.
टी-२० हा तरुणांचा खेळ आहे त्या अनुशंगाने तरुणांना/नवोदितांना संधी देण्याची गरज होती व तसे दिसत पण आहे.

या संघात आशिष नेहरा काय करतो आहे हे समजत नाही. ना तो तरुण आहे ना तंदुरुस्त. क्षेत्ररक्षण व फलंदाजीत नेहराची बोंब आहे. इशांत शर्माची निवड ना होणे एकवेळ पटते कारण तो फॉर्मात नाही. विराट कोहली कमनशिबी ठरला, कारण तो युवा,तंदुरुस्त व फॉर्मातही आहे.

नेहरा एवजी अशोक डिंडा, धवल कुलकर्णी वा उमेश यादवला (ह्याच्या गोलंदाजीचा वेग १४० किमी पेक्षा जास्त आहे जे नेहराला जमत नाही) संधी मिळायला हवी होती

बघुया तर कसे प्रदर्शन करते टीम-इंडिया टी-२० विश्चचषक मध्ये...

ऑल द बेस्ट!

गुरुवार, २५ मार्च, २०१०

मेरे अंगणे में...

"मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है" लावारिस या चित्रपटातील सुपरहिट गाणं अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झाले आहे. मात्र वांद्रे-वरळी सी लिंकच्या नविन लेनच्या उदघाट्नाच्या वेळी अमिताभ बच्चनला पाहुन काँग्रेसचे नेते हे गाणं म्हणतांना दिसत होते.

सर्व प्रमुख वर्तमानपत्रातुन उदघाट्नाची बातमी व निमंत्रण पत्रिका छापुन आली होती मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री व इतर नेते मंडळीच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणुन अमिताभ बच्चन यांचे ही नाव होते. कार्यक्रमात अमिताभ बच्चन अगदी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाजुला बसलेले आपण सर्वांनी पाहिले.

पण जसे हायकमांड कडुन हे गाणं (मेरे अंगणे में) अशोक चव्हाण यांनी ऎकलं त्यांनी सांगुन टाकलं "मला तर माहितच नाही की अमिताभ बच्चनही कार्यक्रमाला येणार आहे. अमिताभच्या उपस्थितीने काँग्रेस व राष्ट्रवादी यांचातील मदभेद उघड झाले आहेत.

नविन लेन सुरु झाल्याने मुंबईकरांची ट्राफीक मधुन सुटका होणार का नाही हे माहीत नाही, मात्र नेते मंडळींची वादाच्या ट्राफीक मधुन सुटका नाही हे नक्की...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

सिनेमा

लहानपणी आम्ही व्हिडिऒ गेम कधीच खेळलो नाही. "सिनेमा" हा आमच्या आवडत्या खेळापैकी एक.
आम्ही एकुण पाच-सहा मुले मिळुन हा खेळ खेळायचो.

एक मोठा पांढरा कपडा (धोतर), एक चपटी काचेची पारदर्शक बाटली, आरसा व काही फिल्म्स.
आमच्या लहानपणी रोलच्या कॅमेर्‍यामध्ये निगेटिव्ह असतात तश्या सिनेमाचे पोस्टर मिळायचे) हे साहित्य जमा करायचे.
टीप: तुमच्या कडे अश्या फिल्म्स नसतील तर जुने निगेटिव्ह घ्या.

मोठा पांढरा कपडा भिंती वर पडद्यासारखा लावायचा, काचेच्या बाटली मध्ये पाणी भरायचे व तिच्या समोर फिल्म धरायची. आता हे सर्व पडद्या समोर धरुन त्यावर उन्हाचे किरण आरसाच्या साह्याने परावर्तीत करुन काचेच्या बाटलीवर टाकले की पडद्यावर सुंदर प्रतिमा उमटेल.

घरात बसुन व्हिडीऒ गेम खेळण्यापेक्षा हि गंमत करुन बघण्यास हरकत नाही.
कारण हा नुसता खेळ नसुन विज्ञान ही आहे, शाळकरी मुले विज्ञान प्रदर्शनातही भाग घेउ शकता.

भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांचा स्मृतीदिन

२३ मार्च १९३१, भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांचा स्मृतीदिन

भारताच्या स्वातंत्रलढयातील माझ्या सर्वात आदरणीय तीन व्यक्ती. कमी वयात यांनी देशासाठी बलीदान दिलं.
हे बलीदान फक्त संपुर्ण स्वराज्य यासाठी होते. सत्ता हया गोष्टीशी काडीमात्रही संबंध नव्हता.

मात्र आज २३ मार्च २०१० रोजी कोणत्याही वर्तमान पत्रात साधी बातमी वा न्युज चॅनलवर कार्यक्रमही नव्हता.
ह्याच्या फोटोला नोटांच्या तर सोडाच फुलाचे हार घालतांना आजची नेते मंडळी दिसली नाही.

स्वातंत्र मिळाल्यानंतर सत्ता मिळालेल्या नेत्यांची जंयती/पुण्यतिथीला हे मिडियावाले उत्साहात साजरी करतात.
हार फुले वाहतांना त्याचे आजचे वारसही दाखवतात, मात्र आज हे मिडियावाले कुठे गायब झाले?

ज्यावयात भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांनी देशासाठी बलिदान दिले, तेवढी जिद्द, धडाडी व देशप्रेम आज कोठेही पहावयास मिळत नाही.

त्यांच्या ह्या बलीदानाला शतश: प्रणाम...

शनिवार, २० मार्च, २०१०

तारक मेहता का उल्टा चष्मा

दररोज सबटिव्ही वर प्रसारित होणारी एक धमाल मालिका.
गोकूळधाम सोसायटी व यामधे राहणारे रंगबिरंगी पात्रे.
भिडे, जेठालाल, दया, रोशन सोढी, तारक मेहता व टप्पु सेना.

प्रत्येक वेळी एक वेगळी कथा, छोटी, विनाताण, अर्थपुर्ण अगदी मनमोकळे हसायला लावतात.
प्रत्येक सण हि सोसायटी उत्साहाने साजरा करते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार्‍या मध्ये कोणताही वाद नसतो
अत्यंत सलोख्याने राहणारे हे शेजारी प्रत्येक भागातुन एक बोध देऊन जातात.

ही मालिका पाहतांना फक्त हसायचे हे एकच काम जमते.
कारण इतर मालिकाप्रमाणे कपट, मत्सर ह्यांचा स्पर्शही ह्यामधील गोष्टींना नसतो.
अश्या मालिका प्रत्येक चॅनलवर असाव्यात

गुरुवार, १८ मार्च, २०१०

मला वाचवा : वाघ

वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी, मात्र हा आता हळु हळु कमी होत आहे.
प्रसार माध्यम व http://www.saveourtigers.com/ वाघाला वाचविण्याचे आवाहन करीत आहेत.
यामध्ये महेंद्रसिंग धोनी, किरण बेदी, बायचुंग भुतीया व सुरिया या सारखे सेलिब्रेटी ही शामील झाले आहेत.
मग आपण मागे का?

आपल्या देशाची शान असलेला हा आपला राष्ट्रीय प्राणी फक्त १४११ एवढ्या कमी प्रमाणात उरला आहे.
यात एक आंनदाची गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात सिध्दार्थ उद्यान, औंरगाबाद येथे एका वाघीणीने ३ पिल्लांना जन्म दिला
व ही संख्या १४१४ वर पोहोचली आहे. आता हि आपली जबाबदारी आहे की ही संख्या कमी होणार नाही.

त्याच्या सुरक्षीततेसाठी जमेल तसे पाऊल उचलायला हवे.
जर हे वाघ कमी होत राहिले तर पुढील पिढीला वाघ फक्त चित्रातच पहायला मिळेल.

शेअर करा, SMS करा, ब्लॉग लिहा.

गुरुवार, ४ मार्च, २०१०

बिर्ला मंदिर, शहाड


ठिकाण: बिर्ला मंदिर, शहाड
कसे जायचे: कल्याण येथुन रिक्षा, शहाड रेल्वे स्टेशन ही जवळ
वैशिष्टे: हे एक अतिशय सुंदर विठ्ठल-रुख्मीणी मंदिर आहे. सुंदर मुर्ती व अतिशय सुंदर नक्शीकाम केलेले असे मंदिर आहे.
शांत परिसर, भक्तीमय वातावरण.

नक्की भेट द्या, कॅमेरा घ्यायला विसरु नका.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...