शुक्रवार, ११ डिसेंबर, २००९

माईंड युवर हार्ट


या आठवड्यात "माईंड युवर हार्ट" (Mind Your Heart) या संकल्पनेने शेअर बाजार समोर एक शिबीर घेण्यात आले होते. त्यातील स्वंयसेवक उच्चरक्तदाब व "अतिताण" याबद्दल माहिती देत होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व तिच माहिती आपल्या सर्वांना पुरवत आहे.

‘अतिताण’ याबद्द्ल माहिती समजावून घेताना त्याची कारणं लक्षात घेतली पाहिजेत

* धुम्रपान, अतिरिक्त मेद किंवा अतिस्थूल्पणा, मधुमेह, बैठी जीवनपध्द्ती

* शारिरीक कामाची/व्यायामाची कमतरता

* अतिरिक्त मीठ सेवन करणे

* कॅल्शियम, पॉटेशियम आणि मॅग्नेशियम यांची कमतरता

* व्हिटामीन ‘डी’ ची कमतरता असणे

* ताण

* वयोमानानुसार

* औषधे उदा. गर्भनिरोधक गोळ्या

* अनुवांशीक किंवा कौटुंबिक पार्श्वभुमी

* जुनाट मुत्रपिंडाचा आजार.

‘अतिताणाची’ लक्षण:

* डोकेदुखी;

* उदासी किंवा संभ्रमीतावस्था असणे

* चक्कर किंवा घेरी येणे

* मळमळ होणे

* छातीमध्ये दुखणे

* श्वास घेण्यास त्रास होणे

* र्‍हदयाचे ठोके अनियमीत असणे

* मुत्राद्वारे रक्त पडणे.

हे टाळता येऊ शकते ते कसे ते आपण जाणुन घेऊ:
१) जीवन पध्दतीत योग्य बदल.
२) सकस व नियोजीत आहार
३) व्यायाम
४) योग्य वजन
५) उच्चरक्तदाब व अतिताण यासाठी लवकरात लवकर उपचार घेणे

या कडे दुर्लक्ष केल्यास परिणाम घातक ठरु शकतात यामुळे पक्षघात, र्‍हदयविकार व किडनी निकामी होणे असे आजार होऊ शकतात. तरी वेळेच याकडे लक्ष दयावयास हवे.

1 टिप्पणी:

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...