शुक्रवार, ११ डिसेंबर, २००९

माईंड युवर हार्ट


या आठवड्यात "माईंड युवर हार्ट" (Mind Your Heart) या संकल्पनेने शेअर बाजार समोर एक शिबीर घेण्यात आले होते. त्यातील स्वंयसेवक उच्चरक्तदाब व "अतिताण" याबद्दल माहिती देत होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व तिच माहिती आपल्या सर्वांना पुरवत आहे.

‘अतिताण’ याबद्द्ल माहिती समजावून घेताना त्याची कारणं लक्षात घेतली पाहिजेत

* धुम्रपान, अतिरिक्त मेद किंवा अतिस्थूल्पणा, मधुमेह, बैठी जीवनपध्द्ती

* शारिरीक कामाची/व्यायामाची कमतरता

* अतिरिक्त मीठ सेवन करणे

* कॅल्शियम, पॉटेशियम आणि मॅग्नेशियम यांची कमतरता

* व्हिटामीन ‘डी’ ची कमतरता असणे

* ताण

* वयोमानानुसार

* औषधे उदा. गर्भनिरोधक गोळ्या

* अनुवांशीक किंवा कौटुंबिक पार्श्वभुमी

* जुनाट मुत्रपिंडाचा आजार.

‘अतिताणाची’ लक्षण:

* डोकेदुखी;

* उदासी किंवा संभ्रमीतावस्था असणे

* चक्कर किंवा घेरी येणे

* मळमळ होणे

* छातीमध्ये दुखणे

* श्वास घेण्यास त्रास होणे

* र्‍हदयाचे ठोके अनियमीत असणे

* मुत्राद्वारे रक्त पडणे.

हे टाळता येऊ शकते ते कसे ते आपण जाणुन घेऊ:
१) जीवन पध्दतीत योग्य बदल.
२) सकस व नियोजीत आहार
३) व्यायाम
४) योग्य वजन
५) उच्चरक्तदाब व अतिताण यासाठी लवकरात लवकर उपचार घेणे

या कडे दुर्लक्ष केल्यास परिणाम घातक ठरु शकतात यामुळे पक्षघात, र्‍हदयविकार व किडनी निकामी होणे असे आजार होऊ शकतात. तरी वेळेच याकडे लक्ष दयावयास हवे.

मंगळवार, ८ डिसेंबर, २००९

माझी क्रिकेट प्रश्‍नमंजुषा

एक इग्लंडचा माजी कर्णधार ज्याणे ७१ कसोटी सामने खेळले मात्र एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. कोण आहे हा खेळाडु?

सोमवार, ७ डिसेंबर, २००९

प्रसार मराठीचा (२)

माझा मागील ब्लॉग दिलेल्या उत्तम प्रतिसादाला धन्यवाद.


पुन्हा यामध्ये थोडे जोडत आहे, मराठी माणसासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी.

महाराष्ट्रात नोकरी कोणतीही असु देत (केंद्र/राज्य/खाजगी) सर्व ठिकाणी परप्रांतीय आहेत. खाजगी क्षेत्रात ते आपल्या गुणवत्तेमुळे आले आहेत.

मात्र राज्य सरकार मधे होणारी नेमणुकीतही मराठी माणुस दुर आहे.
येथेही हळुहळु परप्रांतीय जागा घेउ पाहत आहेत.

यावर उपाय म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराची पात्रता, या उमेदवाराने किमान दहावी पर्यंत मराठीचा अभ्यास केलेला असावा, त्याच्या दहावीच्या गुणपत्रीकेत मराठी विषय असणे अनिवार्य असावे.

जेणे करुन मराठी भुमिपुत्राला नोकरीचा हक्क मिळेल व आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्राच राहील...

माझी क्रिकेट प्रश्‍नमंजुषा

मित्रांनो आजपासुन एक नविन प्रयोग
मी एक क्रिकेटवर प्रश्‍न विचारेल आपले उत्तर कळवावे.

कसोटी इतिहासात एकमेव फलंदाज कोण ज्याणे डावात शतक पुर्ण केले मात्र एकही चौकार वा षटकार मारला नाही. (सर्व धावा धावुनच केल्या.)


Related Posts Plugin for WordPress, Blogger...