शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९

प्रसार मराठीचा


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये व नंतरही गाजलेला मुद्दा आहे तो मराठीचा.
महाराष्ट्रात मराठी भाषाच आता दुर्लक्षीत होत आहे. नोकरी, व्यापार, दैनंदिन व्यवहारापासुन ते दुकानाच्या पाट्या
अश्या सर्वच ठिकाणी मराठी एवजी ईतर भाषा वापरली जाते.

यात आणखी एक बाब म्हणजे टि.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या वाहिन्या, आजकाल सर्वच मोठ्या शहरात केबलवर जवळपास १०० वाहिन्या प्रक्षेपित केल्या जातात. त्यापैकी जास्तीत जास्त हिंदी, ईग्रंजी व इतर प्रांतीय असतात. मात्र सर्वच मराठी वाहिन्या प्रक्षेपित केल्या जात नाहीत.
ज्या प्रमाणे सरकारने मल्टीप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट दाखविणे अनिवार्य केले त्याच प्रमाणे सर्व मराठी वाहिन्या ही दाखविणे अनिवार्य करावे. ज्या मुळे पुढच्या पिढीला मराठी भाषेमधील कार्यक्रम पहावयास मिळतील.

यालाच जोड म्हणजे सर्व मराठी वाहिन्या सर्व महाराष्ट्रभर विना केबल कनेक्शन उपलब्ध करुन द्याव्या. जेणे करुन अगदी गावोगावी मराठीचा प्रसार होईल. बातम्या, मनोरंजन, चित्रपट अश्या माध्यमातुन लोकांचे समाज प्रबोधन सहज होईल. त्याचप्रमाणे युवा पिढीला मराठी भाषेविषयी आणखी आदर निर्माण होईल.

असे केल्यास फायदा हा जनता, सरकार व वाहिन्या या सर्वांचा होईल, कारण जनतेला संपुर्ण मराठी मनोरंजन, सरकारला प्रसार व प्रचार आणि जाहिरातीच्या माध्यमातुन वाहिन्याही फायद्यात राहु लागतील.

४ टिप्पण्या:

 1. एकदम झक्कास idea आहे. खरच अस केल पाहिजे

  उत्तर द्याहटवा
 2. झक्कास आयडीया !

  माझ्या डोक्यातही अश्याच आयडीया येतात पण त्या पुढे कश्या प्रत्यक्षात आणायाच्या हे कळत नाही.

  शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 3. १ नंबर देशपांडे...जय महाराष्ट्र...

  उत्तर द्याहटवा

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत...

मी भटकतो, मी फोटो काढतो आणि मनात आलेले शब्द ब्लॉग वर लिहून मोकळा होतो. आपल्याला जर लिखाण आवडले असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

- नागेश देशपांडे

मी एक हौशी लेखक

फेसबुक पेज Like करा. https://www.facebook.com/haushilekhak

Related Posts Plugin for WordPress, Blogger...