मंगळवार, २४ नोव्हेंबर, २००९

आशाणे धबधबा


आशाणे धबधबा: एक अतीशय सुंदर, निर्सगरम्य ठिकाण. भिवपुरी रोड, कर्जत, रायगड.
जवळचे रेल्वेस्टेशन: भिवपुरी रोड मुंबईहुन फक्त दोन तासाचा प्रवास.

कधी जावे: मान्सुन मध्ये एकदिवसीय सहलीला एक उत्तम ठिकाण.

कसे जायचे: (मुंबईहुन) कर्जत लोकलने भिवपुरी रोड रेल्वेस्टेशन उतरायचे, पुढे पुर्वेला चालत जायचे अंदाजे ४५ मिनिटे. वाट गावातुन व शेतातुन असल्याने, भाताची शेती, पारंपारीक ग्रामीण घरे यासारखी सुंदर द्रुश्ये पहावयास मिळतात.

कपडे, कॅमेरा, पाणी, जेवण, प्रथमोपचाराचे सामान, संपर्कासाठी मोबाईल सोबत घेउन जाणे योग्य राहील. शक्यतो समुहाने जावे, ट्रेकी़ंगचे किंवा वाटरप्रुफ शुज घालावेत. खुप जड सामान घेणे टाळावे.

निसर्गाचा आनंद घ्यावा, मात्र प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी

सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

एक अनोखी प्रेमकहाणी!नायकाचं नायिकेवर प्रेम आहे.

नायिकेच मात्र खलनायकावर प्रेम आहे.

पण खलनायकाच नायकाच्या बहिणीवर प्रेम आहे.

नायकाच्या बहिणीच मात्र नायिकेच्या भावावर प्रेम आहे.

पण, नायिकेच्या भावाच खलनायकाच्या बहिणीवर प्रेम आहे.

खलनायकाच्या बहिणीच नायकाच्या भावावर प्रेम आहे.

पण नायकाच्या भावाच नायिकेच्या बहिणीवर प्रेम आहे.

नायिकेच्या बहिणीच मात्र नायकावर प्रेम आहे.


या भानगडीत शेवटी २ माणसं आत्महत्या करतात. ते कोण?

सांगा! सांगा!...

...नाही जमत?


... अहो निर्माता आणि दिग्दर्शक!!!!

(ता. क. लेखक मी नाही)

शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९

प्रसार मराठीचा


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये व नंतरही गाजलेला मुद्दा आहे तो मराठीचा.
महाराष्ट्रात मराठी भाषाच आता दुर्लक्षीत होत आहे. नोकरी, व्यापार, दैनंदिन व्यवहारापासुन ते दुकानाच्या पाट्या
अश्या सर्वच ठिकाणी मराठी एवजी ईतर भाषा वापरली जाते.

यात आणखी एक बाब म्हणजे टि.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या वाहिन्या, आजकाल सर्वच मोठ्या शहरात केबलवर जवळपास १०० वाहिन्या प्रक्षेपित केल्या जातात. त्यापैकी जास्तीत जास्त हिंदी, ईग्रंजी व इतर प्रांतीय असतात. मात्र सर्वच मराठी वाहिन्या प्रक्षेपित केल्या जात नाहीत.
ज्या प्रमाणे सरकारने मल्टीप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट दाखविणे अनिवार्य केले त्याच प्रमाणे सर्व मराठी वाहिन्या ही दाखविणे अनिवार्य करावे. ज्या मुळे पुढच्या पिढीला मराठी भाषेमधील कार्यक्रम पहावयास मिळतील.

यालाच जोड म्हणजे सर्व मराठी वाहिन्या सर्व महाराष्ट्रभर विना केबल कनेक्शन उपलब्ध करुन द्याव्या. जेणे करुन अगदी गावोगावी मराठीचा प्रसार होईल. बातम्या, मनोरंजन, चित्रपट अश्या माध्यमातुन लोकांचे समाज प्रबोधन सहज होईल. त्याचप्रमाणे युवा पिढीला मराठी भाषेविषयी आणखी आदर निर्माण होईल.

असे केल्यास फायदा हा जनता, सरकार व वाहिन्या या सर्वांचा होईल, कारण जनतेला संपुर्ण मराठी मनोरंजन, सरकारला प्रसार व प्रचार आणि जाहिरातीच्या माध्यमातुन वाहिन्याही फायद्यात राहु लागतील.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९

एक उनाड दिवस

शनिवार, ३१ ऑक्टोबर २००९ रोजी बायको माहेरी गेलेली, ऑफीसही अर्धादिवसच.१० ते १ ऑफीस करुन मी बाहेर पडलो आणि सुरु झाला तो "एक उनाड दिवस..."

सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच उठलो, आवरुण दररोजची ८.२० कल्याण ते सी.एस.टी लोकल पकडली.
नेहमीचा ग्रुप संपुर्ण मस्ती करत करत १०.०० वाजता मी ऑफीसला पोहोचलो. पटापट काम संपवले आणि १ वाजता बाहेर पडलो.

जवळच काळाघोडा उत्सव चालु असल्याचे समजले, मी लगेचच तिथे गेलो व त्याचा आनंद घेतला.अनेक उत्तम कलाकुसरी च्या वस्तु पाहावयास मिळाल्या. मग फिरत फिरत मी हॉर्नीमन सर्कलला पोहोचलो व एक मस्त एक Frankie खाल्ले, मात्र खुप खुप विंडो शॉपींग केल्यानंतर पुन्हा भुक लागली.आता जवळ आली ती भारतीय रिजर्व बॅंकेजवळची खाऊ गल्ली, एकदम तोंडाला पाणीच सुटलं.पोटभर तवा पुलाव खाल्ला आणि स्वारी निघाली परतीच्या प्रवासाला.

सी.एस.टी ला येउन कल्याण स्लो लोकल पकडली, दुपारची वेळ होती, पहिल्या दर्जाच्या डब्यात
एकजणही नव्हतं, मस्त विंडोसीटवर झोपलो, की कल्याणला आल्यावरच जाग आली.

घरी आलो तरीही फ्रेश वाटत होतं, कारण असा हा "एक उनाड दिवस" कधीकधीच नशीबी येतो
मन म्हणतं घे जगुन एक दिवस तरी मजेत कश्याला उद्याची चिंता.

बघा तुम्हीही असाच एक दिवस घालवुन

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

माथेरान

नमस्कार,
खुप दिवसांनी लिहायला वेळ मिळाला...
आता पुन्हा सुरुवात फोटोने करीत आहे.
एक नयनरम्य दरी


एक गावं


सह्यांद्रीच्या पर्वतरांगा

माथेरानसह्यांद्रीच्या पर्वतरांगा


राणीची सफर


राणीची सफर


राणीची सफर


सुटले का तोंडाला पाणी...

आपला अभीप्राय कळवा...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...