गुरुवार, २२ मे, २००८

गुंता

एक असतो दोरा आणि एक असते दोरी.
दोघांचे लग्न होतं. काही महिन्यांनी दोरी गर्भवती असते.
पहिल्या बाळांतपणात तिला एक दोरा होतो.

काही महिन्यांनी दोरी पुन्हा गर्भवती होते.
दुसर्‍या बाळांतपणात तिला दोन दोर्‍या होतात.

काही महिन्यांनी दोरी पुन्हा गर्भवती होते.
तिसर्‍या बाळांतपणात तिला तीन दोरे होतात.

काही महिन्यांनी दोरी पुन्हा गर्भवती होते.
यावेळी मात्र डॉक्टर म्हणतात "आँपरेशन करावे लागेल"

आत आँपरेशन सुरु असते, दोरा बाहेर येर्‍या झार्‍या घालत असतो.
डॉक्टर घाम पुसत पुसत बाहेर येतात.

दोरा विचारतो "काय झालं सर"

डॉक्टर म्हणतात "साँरी गुंता झाला..."

बुधवार, २१ मे, २००८

एक किस्सा प्रवासातला...

शहर: पुणे
स्थळ: स्वारगेट बसस्थानक
वेळ: पहाटे ५.३० वाजता

मी औरंगाबाद हुन कोल्हापूरला जात होतो. स्वारगेट बसस्थानकात उभा होतो, आणि पुणे स्टेशन ते पणजी बस आली. मी आत गेलो, बसायला जागा मिळाली. गाडी सुटण्यास थॊडा वेळ होता. गाडीत फक्त चार सीट रिकामे होते.

इतक्यात कंडक्टर दोन विदेशी पर्यटकांना घेउन आला. व त्यांना पहिल्या सीटवर बसविण्याच्या उद्देश्याने पहिल्या सीट वरील प्रवाश्याला (जो एकटा होता) विनंती केली की मागच्या सीटवर (माझ्या बाजूला) बसा. मात्र त्याने उध्धटपणे नकार दिला. कंडक्टरने खुप विनंती केली मात्र तो काही ऎकत नव्हता.

थोड्या वेळात त्या विदेशी पर्यटकांचा गाईड आला, व तो ही त्या प्रवाश्याची विनंती करु लागला. मात्र तो तयार झाला नाही. दोघे पर्यटक हा तमाशा पाहत होते, ईतर प्रवाशी ऎकत होते.

शेवटी काही मार्ग निघत नाही बघुन गाईडच विदेशी पर्यटकांना म्हणाला " Will you Please adjust with the last seat" ते दोघे पर्यटक लगेचच तयार झाले, व अगदी शेवटच्या सीटवरती जाऊन बसले. गाईड व विदेशी पर्यटकांनी एकमेकांचे आभार मानले.

जाता जाता दारात उभा राहुन गाईड (मोठ्याने) म्हणाला "बघा किती सुशिक्षित लोक आहेत हे विदेशी, विनंती केली की लगेचच तयार झाले"

आणि प्रवाश्यात हशा पिकला...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...