शनिवार, १२ एप्रिल, २००८

"मी माझा" मात्र ऎका दारुड्याच्या नजरेतुन

"मी माझा" हे फक्त नावचं पुरेस आहे सर्वांनी वाचले असेलच,
सादर आहे "मी माझा" मात्र ऎका दारुड्याच्या नजरेतुन
---------------------------------------------------------
आपण किती प्यायची
ते आपणच ठरवायचं,
एकाला चढली तर
दुस-याने सावरांयच

---------------------------------------------------------
आपण पीत असतांना
तु बाटली मागवली
तु तसाच राहिला
मला मात्र चढली

---------------------------------------------------------
परवा एक बेवडा
आपलं पाकीट शोधत राहिला
कसं सांगु त्याच पाकीट
मारतांना मी दुसरा बेवडा पाहिला.

---------------------------------------------------------
सगळीच बीअर-बार
दुरुन छान दिसतात
आत गेल्यावर कळतं
ती किती गजबजलेली असतात.

---------------------------------------------------------
प्रत्येकाला एक घर असावे
घरी परतण्यासाठी
प्रत्येक घराला एक ऒसरी असावी
रात्री पिउन आल्यावर बायकोनी घरात घेतले नाही,तर बाहेर झॊपण्यासाठी

---------------------------------------------------------
दारुचे दुकान कुठेही असते
कुठेही असते
तरी जोरात चालते

---------------------------------------------------------
तु सोबत दिली तर
पिण्यात अर्थ आहे,
माझ्यासाठी थम्स अप,
तर तुझंसाठी सोडा आहे
---------------------------------------------------------
मरेल म्हणुन मी
पिणं थांबवलं
तर मलाच वाटतं मी
मरण उगीचच लांबवल

---------------------------------------------------------
तु पिउन पडत असतांना
मी तुझ्याकडे धावलो ते
तुला सावरायला नव्हे, सोबतीला,
नाहीतर मला तरी कुठे येतय सावरायला

---------------------------------------------------------
आता एक नंबर
>>>
पाजणार कोणी असेल
तर पिण्यात अर्थ आहे,
स्वत:च्या पैश्याने प्यायला
आम्ही काय मुर्ख आहे?

मराठी मुलगी

मित्रांनो, मराठी मुलगी कशी असते. तिचे काही वैशिष्टे व गुणधर्म
१) ती नेहमीच बाबांची लाडकी, मात्र आईच्या धाकात असते.
२) घरातल्या मोलकरणीचं मधे मधे बोलणं तिला कधीच आवडत नाही.
३) स्ट्रॊक्स समजत नसले तरी तिला क्रिकेट पहायचे असते.
४) बस, रेल्वे असॊ वा लोकल तिला विंडो सीटच हवी असते.
५) ती मेहंदी, चित्र व रांगोळी छान काढते.
६) शाहरूख, सचिन, माधुरी व राहुल यांचा नुसता फोटो जरी दिसला तरी, अय्या, वाव, ए ते बघ ना! असल्या रिअ‍ॅक्शन्स देते.
७) चाँकलेट व आईसक्रिम हे वीक पाँईट
८) तिला दादाच्या सर्व मैत्रीनी शहाण्या वाटतात.
९) सकाळी पेपरात पहिले राशी भविष्य वाचेल आणि मगच दिनचर्या सुरु करेल.
१०) मैत्रीण जाते म्हणून ती सायबर कॅफेत जाते.
११) हिंदीत बोलतांना तारांबळ उडते मात्र सर्व हिंदी गाणी पाठ असतात.
१२) गाण्याच्या भेंड्या सर्वात आवडता खेळ
१३) घरात बाबा चिडले की पहिले हिला रडू येते.
१४) घरात सर्वजण तिला "सोनु" म्हणतात.
१५) ईतर खेळापेक्षा बॅडमिंटन हा खेळ जास्त खेळते.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...